ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत 'सिंधुरत्न महिला दशावतार मंडळ' च्या कलाकारांचा सत्कार.

कणकवलीत 'सिंधुरत्न महिला दशावतार मंडळ' च्या कलाकारांचा सत्कार.

कणकवलीत 'सिंधुरत्न महिला दशावतार मंडळ' च्या कलाकारांचा सत्कार.  

Article image

      

कणकवली | ब्यूरो न्यूज : लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या तसेच महिला दशावतार संस्थांमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अग्रणी असलेल्या कणकवलीच्या 'सिंधुदुर्ग महिला दशावतार मंडळ' संस्थेचा जनजागृती सेवा संस्था, बदलापूर यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. कणकवली येथील तेली आळी मधल्या भवानी सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. याबाबत सिंधुरत्न महिला दशावतार मंडळाच्या अध्यक्ष व अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी माहिती दिली असून जनजागृती सेवा संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Article image


यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, अरविंद सुर्वे, सिंधुरत्न महिला दशावतार मंडळाच्या अध्यक्षा व अभिनेत्री अक्षता कांबळी, लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल गाड उपस्थित होते.


यावेळी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या विविध कामांची माहिती दिली. याधेळी अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्यासह सर्व स्त्री व पुरुष कलाकार, वाद्यवृंद, रंगभूषाकार, दिग्दर्शक, लेखक यांचा शाल, श्रीफळ, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड, लावण्यसिंधू लोककला व चित्रपट सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जनजागृती सेवा संस्थेचे अरविंद सुर्वे, अनिल कांबळी, गंधाली तिरपणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाचे औचित्य साधून बोलताना चंद्रशेखर उपरकर यांनी विशेष सांस्कृतिक माहितीपर मनोगत व्यक्त केले. दशावतारी कलाकार विनायक येरागी, सूर्यकांत गुरव, गोविंद लाड, गुरुनाथ मेस्त्री, दत्तात्रय मेस्त्री, गिरीश लिंग्रस, साक्षी आमडोस्कर, शिवानी विचारे, मयुरी सावंत यांनी त्यांचे विशेष विचार मांडले.


जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने दशावतार नाटकात स्त्रीची भूमिका करणारे पुरुष कलाकार संतोष चाळके, रोहित राणे, परशुराम सांगवेकर, सुरेश गुरव, संजय लाड, सिंधुरत्न महिला दशावतार नाटकातील कलाकार साक्षी आमडोसकर, पूजा दळवी, मयुरी सावंत, शिवानी विचारे, अर्चना करगनी, आराध्या पुजारे, गौरी परब, मैथिली गावकर, हर्षदा सुतार संगीत साथ देणारे दत्तात्रय मेस्त्री, अर्जुन कोरगावकर, भावेश सावंत, ओंकार मेस्त्री, सागर मेस्त्री, रामदास सामंत, गिरीश लिंग्रस, गणेश घाडी, सुंदर साटम, अजय सांगवेकर, प्रतीक मिठबावकर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करून सत्कार करण्यात आला. गुरुनाथ तिरपणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स