'आम्ही ज्या दिवशी राजकारणात येऊ त्या दिवशीपासून भले भले गायब होतील...!'
'आम्ही ज्या दिवशी राजकारणात येऊ त्या दिवशीपासून भले भले गायब होतील...!'
लाईव्ह मिडियाच्या पत्रकार मित्राच्या सन्माना दरम्यानच्या मनोगतात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांचे 'ते' वक्तव्य चर्चेत.
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. २५ जुलै २०२६ रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने पत्रकार तुळशीदास कुडतरकर यांचा 'लाईव्ह मिडियाचे प्रतिनिधी' म्हणून प्रातिनिधिक स्वरुपात राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते आणि राजु म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले होते.
त्यावेळी मनोगता दरम्यान श्री. पेडणेकर यांनी उपस्थितांच्या वतीने श्री. कुडतरकर यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या होत्या आणि नंतर," आम्ही एक सामान्य सामाजिक कार्यकर्ते आहोत, आणि आमचे काम नि:स्वार्थी भावनेने करत असतो, पण या कामाच्या आडकाठी करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर, मग तो कोणी ही असो, आणि आम्हाला सामाजिक कार्यकर्ते च राहू द्या, ज्या दिवशी आम्ही राजकारणात येऊ, त्या दिवशी पासून भलेभले गायब होतील," असे वक्तव्य केले होते. यावेळी अप्पासाहेब पटवर्धन चौकातील नगरपंचायत च्या मालकी च्या जागेतील समस्त व्यापारी बांधव बहुसंख्येने उपस्थितीत होते.
यावेळी अविनाश गावडे, जमिल कुरेशी, प्रसाद पाताडे, सईद नाईक, बाबुराव घाडीगावकर, इजाझ काजी, निलेश निखार्गे, लक्ष्मण महाडिक, नजीर भाई, शेखर बाणे, महेश वायंगणकर, भगवान कासले, सादये शेठ, नाडकर्णी, प्रभाकर कदम आदि व्यापारी बहुसंख्येने उपस्थितीत होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)