ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सकल मराठा समाज बांधव खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने महसुली गावांच्या नावात बदल करण्याबाबत निवेदन.

सकल मराठा समाज बांधव खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने महसुली गावांच्या नावात बदल करण्याबाबत निवेदन.

प्रकाशन: 14 Jul 2025 09:21 PM
वाचन संख्या 105

खारेपाटण | ब्यूरो न्यूज : ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या शिवाजी पेठ व संभाजी नगर या दोन महसुली गावांच्या नावामध्ये चुकीची महसुली एकेरी नोंद असल्याने त्यामध्ये बदल करून यापुढे छत्रपती शिवाजी महाराज पेठ व छत्रपती संभाजी महाराज नगर असा त्याचा नामविस्तार करण्याची लेखी मागणी खारेपाटण माजी सरपंच श्री. रमाकांत राऊत यांनी सकल मराठा समाज बांधव खारेपाटण पंचक्रोशीच्या वतीने शासनाकडे केली आहे.

याबाबत श्री. राऊत यांनी नुकतीच कणकवली प्रांत अधिकारी श्री. जगदीश कातकर व तहसीलदार श्री. दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन खारेपाटण येथील २ महसुली गावांच्या नावात बदल करण्याचे लेखी मागणीचे निवेदन सादर करून महापुरूषांच्या नावाचा एकेरी उल्लेख होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ५ महसुली गावं येत असून यापैकी शिवाजी पेठ व संभाजी नगर या दोन गावांच्या नावात आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचे तथा राष्ट्रपुरुषांच्या नावांचा उल्लेख असल्याने शासनाच्या महसूल नोंद रजिस्टरला महापुरूषांच्या एकेरी नावाचा उल्लेख असल्याने ही बाब महापुरूषांचा अनादर व अवमान करणारी असून सदर महसुली गावांचा तात्काळ नामविस्तार करून महापुरुषांचा आदर करावा असे देखील श्री. राऊत यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स