ताज्या बातम्या
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कूलचे यश. कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. कणकवलीत गिरिजा प्रभुदेसाई यांचा 'कथक' नृत्य वंदना कार्यक्रम. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात. पोईप गावचा मुंबईस्थित सुपुत्र कु. अक्षर रमाकांत पालव याला जागतिक कराटे स्पर्धेत दोन सिल्वर व एक ब्राॅन्झ मेडल प्राप्त. शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपये जमा करायचे निर्देश : मुख्यमंत्र्यांची माहिती तरुण पिढीला सुसंस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक - सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात : उद्योजक दत्ता सामंत नगरपरिषद व नगर पंचायत क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करायचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश. रोझरी इंग्लिश स्कूलची मालवण तालुकास्तरीय खो - खो स्पर्धेत चषकीय कामगिरी. मालवणात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात.
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)

कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.

कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन. 

Article image

ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्पलाॅईज फेडरेशनचे चेअरमन देविदास तुळजापूरकर आणि ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्पलाॅईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्पलाॅईज फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती


सिने अभिनेते अभय खडपकर आणि सुर्वे साहित्याचे अभ्यासक प्रसाद घाणेकर यांचे सादरीकरण. 


कणकवली : कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या काव्य आणि विचारांना उजाळा देण्यासाठी कणकवली येथे अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी मुक्त पीठ, चिकूची बाग, गोपुरी आश्रम, कणकवली येथे सायंकाळी ४:४५ वाजता हा सोहळा होणार आहे. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी खर्च करणारे’ या भावनेतून कामगार व कर्मचारी, नारायण सुर्वे यांच्या काव्यकर्तृत्वाला अभिवादन करणार आहेत. 


यावेळी ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्पलाॅईज फेडरेशनचे चेअरमन देविदास तुळजापूरकर आणि ऑल इंडिया बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्पलाॅईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी व महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्पलाॅईज फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 


कार्यक्रमाचे सादरीकरण सिने अभिनेते अभय खडपकर आणि सुर्वे साहित्याचे अभ्यासक प्रसाद घाणेकर करणार आहेत.


बॅंक ऑफ महाराष्ट्र एम्पलाॅईज युनियन, कोल्हापूर यांनी निमंत्रित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी संतोष रानडे (9422392638) व धिरेश काणेकर (9404937696) या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स