ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
खारेपाटण विद्यालयात स्वरपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात.

खारेपाटण विद्यालयात स्वरपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात.

प्रकाशन: 14 Jul 2025 08:30 PM
वाचन संख्या 223

खारेपाटण | ब्यूरो न्यूज : खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथील सभागृहात स्वरपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गुरुवार, १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते दहावी पाठ्यक्रमातील कवितांवर आधारित गायन, वादन, नृत्य, कविता, अभिवाचन व एकपात्री अभिनयाचा पंचसूत्री कार्यक्रम करणारी ही एकमेव शाळा आहे. या कार्यक्रमात ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्तमरित्या सादरीकरण केले.

यावेळी प्रशालेचे संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांची संकल्पना व संगीत संयोजन असलेल्या ह्या कार्यक्रमात कु. प्राजक्ता ठाकूर देसाई हिने गुरुपौर्णिमेचे महती स्पष्ट करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी आयुषी गुरव, दिबा ठाकूर, दिक्षा कर्ले व आराध्य पराडकर यांनी गुरु महिमा व्यक्त करणारे नृत्य सादर केले. प्रशालेचे शिक्षक श्री. लक्ष्मीकांत हरयाण यांनी गीत गायन केले. कार्यक्रमाची सांगता संगीत शिक्षक संदिप पेंडूरकर यांनी ‘बलसागर भारत होवो’ ही कविता भैरवी रागामध्ये गायन करून केली.

या कार्यक्रमास श्रीधर पाचंगे, मंथन चव्हाण, आयुष मांगले, शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण तसेच पूनम गुरव, शार्मीन काझी व प्राथमिक विभागातील शिक्षिकांचे नृत्य दिग्दर्शन लाभले. संस्था अध्यक्ष प्रवीण लोकरे व संस्था संचालक, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि खारेपाटण पंचक्रोशीतील रसिकांनी या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशालेच्या दहावीतील विद्यार्थिनी श्रुती जामसंडेकर, संस्कृती निगरे, प्राजक्ता ठाकूर देसाई व संस्कृती भोर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स