ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कोळंब खालचीवाडी येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या.

कोळंब खालचीवाडी येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या.

प्रकाशन: 14 Jul 2025 02:59 PM
वाचन संख्या 1005

मालवण | ब्यूरो न्यूज : कॅन्सर सारखा गंभीर आजार झाल्याच्या भीतीने नितीन मुकुंद कोचरेकर (वय ४३, रा. कोळंब खालचीवाडी) या तरुणाने आज पहाटे राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर तुकाराम कोचरेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली आहे.

कोळंब खालचीवाडी येथील नितीन कोचरेकर याच्या तोंडात फोड आले होते. त्यामुळे त्याला आपल्याला कर्करोग झाला आहे असे वाटले. या भीतीनेच त्याने राहत्या घरी पडवीत नायलॉनच्या दोरीने वाशाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पवार यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेत पंचनामा केला. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पवार अधिक तपास करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स