किल्ले सिंधुदुर्गचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने मालवण बंदर जेटीवर जल्लोष.
जिल्हा प्रशासन, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी यांच्यावतीने आनंदोत्सव.
मालवण | ब्यूरो न्यूज : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत किल्ले सिंधुदुर्गचा समावेश झाल्याने शनिवार, १२ जुलै रोजी जिल्हा प्रशासन, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी यांच्यावतीने मालवण बंदर जेटीवर जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला.
युनेस्कोने सन २०२४-२५ च्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांचा समावेश केला. येथील जलदुर्ग किल्ले सिंधुदुर्गचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जल्लोष साजरा करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार बंदर जेटी येथे जिल्हा प्रशासन, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आणि शिवप्रेमी यांच्यावतीने जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांत ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह प्रेरणोस्तव समिती अध्यक्ष गुरू राणे, ज्योती तोरसकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, गणेश कुशे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, अन्वेषा आचरेकर, शिल्पा खोत, यतीन खोत, सुदेश आचरेकर, आबा हडकर, मांजरेकर यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाऊ सामंत यांनी शिवप्रार्थना सादर केल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)