चौके येथे भीषण अपघातात बेळगाव खानापूर येथील युवकाचा जागीच मृत्यू..
बोलेरो पिक अप आणि दुचाकीचा झाला अपघात…
चौके | अमोल गोसावी : चौके पेट्रोल पंप नजीक वळणावर दुचाकीची बोलेरोशी भीषण धडक होऊन एक भीषण अपघात घडला.
मालवण येथून आज शुक्रवार दिनांक २९ रोजी सकाळी चौके मार्गे बेळगाव- खानापूर येथे आपल्या ताब्यातील दुचाकी स्प्लेडंर ( KA-22-HD-4060) ने जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर समोरून येणाऱ्या म्हणजेच कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासे वाहतूक करणाऱ्या बोलोरो पिकअप या टेंपोला चालकाच्या दिशेने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की डांबरी रस्त्यावर पडून दुचाकीचालकाच्या डोक्याला जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
मालवण येथे गवंडीकामा निमीत्त असणारा अशोक धुळू जंगले (२३) मुळ रा. बेळगांव-खानापूर हा युवक शुक्रवारी सकाळी मालवण वरुन स्प्लेंडर मोटरसायकल ने चौके नेरुरपार मार्गे बेळगांव येथे जात आसताना चौके नारायणवाडी पेट्रोल पंपानजीक च्या वळणावर कुडाळवरुन मालवणच्या दिशेने येणाऱ्या चालक संदिप देसाई यांच्या ताब्यातील बोलोरो पिक अप MH 07-AJ 2247 ला चालकाच्या बाजूने मागील हौद्याला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर अशोक जंगले रस्त्यावर पडला. डोक्यात हेल्मेट असूनही जोरदार मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच चौके येथील व्यावसाईक संतोष गावडे, बी. जी. गावडे. संजय गावडे, हेमंत गावडे, शिवाजी गावडे, अमित चव्हाण ,अजीत गावडे, यानी अपघात स्थळी धाव घेतली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला जवळपास एकतास वहातुक खोळंबली होती. मालवण पोलिस ठाणेचे सहा. पो. निरीक्षक नितीन नरळे. पोलिस कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर, एच व्ही पेडणेकर, व्ही एच पाटील यांनी अपघातस्थळी येउन पंचनामा केला आणि अधिक तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी चौके आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
( फोटोतली दृष्यं विचलित करु शकतात)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)