ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
घाडीगांवकर सहकारी पतपेढीच्या नूतन कार्यालयाचे शानदार उदघाटन!

घाडीगांवकर सहकारी पतपेढीच्या नूतन कार्यालयाचे शानदार उदघाटन!

प्रकाशन: 29 Oct 2021 11:07 AM
वाचन संख्या 95

मसुरे | सौ. प्राजक्ता पेडणेकर : घाडीगांवकर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या पतपेढीच्या देवगड – जामसंडे शाखेच्या नूतन कार्यालयाचे शानदार उदघाटन ,संस्थेचे अध्यक्ष रघुवीर शांताराम वायंगणकर यांच्या हस्ते झाले.
या वेळी संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बा. पारधी,देवगड
जामसंडे नगराध्यक्षा सौ .प्रियांका प्र. साळसकर,नगरसेवक नीरज ग. घाडी,नगरसेविका सौ .प्राजक्ता प्रदीप घाडी,देवगड अर्बन बँक संचालक उल्हास मणचेकर,संस्था संचालक अशोक घाडी,पांडुरंग घाडी,सहदेव दाभोळकर, व्यवस्थापक सुहास गांवकर,सोमा घाडीगांवकर ,(मुंबई)उदय गावकर (कणकवली)पांडुरंग जंगले,भालचंद्र घाडी (देवगड)उपस्थित होते . या वेळी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे हे संस्थेचे सभासद असल्याने त्या सर्वांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या उदघाटन सोहळ्यानिमित्त बुवा समीर कदम यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.पतपेढीचे नूतन कार्यालय “अनुसया कॉम्प्लेक्स “पहिला मजला देवगड एसटी बस स्थानक नजीक कार्यरत सुरू झाले आहे.या पतपेढीचे मुख्य कार्यालय शाखा काळाचौकी मुंबई येथे असून भांडुप,डोंबिवली,कणकवली,
देवगड अशा शाखा कार्यरत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स