ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे आणि मत्स्य खात्याची तत्परता.

मत्स्य उद्योगमंत्री नितेश राणे आणि मत्स्य खात्याची तत्परता.

प्रकाशन: 24 Apr 2025 01:44 PM
वाचन संख्या 223

पारंपारिक मच्छिमाराच्या कुटुंबीयास मिळवून दिले सात आठवड्यांमध्ये पाच लाख रुपये.

भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलचा पाठपुरावा.

ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तारामुंबरी येथील संतोष सारंग या पारंपारिक मच्छीमाराचा २ मार्च २०२५ रोजी मासेमारी करताना बुडून मृत्यू झाला होता. कुटुंबामध्ये त्यांच्या पाश्चात पत्नी व मुलगा तसेच भाऊ असा परिवार आहे. पारंपरिक मासेमारी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले. तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. याची दखल मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी घेऊन मत्स्य उद्योग खात्यास तात्काळ अपघात गट विमा च्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची निर्देश दिले. मत्स्य खात्याने तातडीने पावले उचलत महाराष्ट्र शासन अंतर्गत रुपये एक लाख चा प्रस्ताव व केंद्र शासन अंतर्गत पाच लाख रुपयांचा प्रस्ताव अवघ्या दोन आठवड्यात तयार करून राज्य व केंद्र शासनाकडे पाठवला. यानंतर मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्या कार्यालयाने त्याचा योग्य पाठपुरावा केल्यामुळे अवघ्या सात आठवड्यामध्ये पारंपारिक मच्छीमारांच्या कुटुंबीयास रुपये पाच लाखाचा अपघात गट विमा नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हैदराबाद यांनी मंजूर केला. लवकरच राज्य शासनाकडून मिळणाऱ्या एक लाख रुपये मंजूर होतील असे मत्स्य व्यवसाय अधिकारी यांनी सांगितले.

संपूर्ण पाठपुराव्याच्या प्रक्रियेमध्ये मत्स्यव्यवसाय खात्याचे सिंधुदुर्ग सहाय्यक आयुक्त श्री सागर कुवेसकर, देवगड परवाना अधिकारी पार्थ तावडे, सुरक्षारक्षक धाकोजी खवळे तसेच प्रादेशिक उपयुक्त नागनाथ भादुले सह. आयुक्त युवराज चौगुले आणि महेश देवरे यांनी प्रस्ताव लवकर मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टी चे स्थानिक पदाधिकार ज्ञानेश्वर खवळे तसेच बाळा खडपे तसेच तारा मुंबरी मच्छीमार सहकारी संस्थे चे अध्यक्ष विनायक प्रभू यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे व महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग विभाग यांच्या संवेदनशील तत्परतेमुळे देशातील आतापर्यंतची सर्वात जलद अपघाती मृत्यूतील राज्य व केंद्र शासनाची आर्थिक पारंपारिक मच्छीमारास मदत मिळू शकली. याबद्दल संबंधित विषयाचा पाठपुरावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलकडून आभार व्यक्त करीत आहेत अशी माहिती भाजपा मच्छिमार सेल जिल्हा संयोजक श्री. रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स