वर्दम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती.
पोईप | ब्यूरो न्यूज : पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय विरण पोईपचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, ०८ जुलै रोजी संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर पोईप एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल कांदळकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संजय पडते, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, विलास माधव, कमलेश प्रभू, महेंद्र पालव, संजय माधव, छोटू ठाकूर, सुरेश नेरुरकर, पंकज वर्दम, महेश पालव, सत्यवान पालव, नंदकिशोर तावडे, अनिकेत तेंडुलकर, मुख्याध्यापक विकास कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मनोगतपर भाषण केले. प्रशालेचे मुख्याध्यापक विकास कुंभार यांनी प्रशालेच्या प्रगती बाबत आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांतून दादा साईल, संजय पडते, संजय माधव, अनिल कांदळकर व इतरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दशक्रोशीतील देणगीदारांनी दिलेल्या रोख रक्कमेतून इयत्ता पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. यावेळी सुमारे ८० हजाराच्या वर रक्कमेच्या देणगीतून विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी प्रशालेचे सर्व सहाय्यक शिक्षक, ज्युनियर कॉलेजचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतकी सावंत, श्री. पवार, प्रास्ताविक विकास कुंभार तर आभार विष्णू महाजनी यांनी व्यक्त केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)