ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
समन्वय समितीच्या आंदोलनात शिक्षक समितीचा सक्रीय सहभाग.

समन्वय समितीच्या आंदोलनात शिक्षक समितीचा सक्रीय सहभाग.

प्रकाशन: 09 Jul 2025 08:52 PM
वाचन संख्या 250

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : कर्मचारी, शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, संचमान्यतेच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब, शेतकरी – शेतमजूर, कष्टकरी – कामकरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची होणारी दुरवस्था, कमी पटसंख्येसाठी शिक्षक जबाबदार अशाप्रकारची केली जाणारी बदनामी, शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधांची वानवा, बी.एल.ओ. सह दैनंदिन अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या अशैक्षणिक व अन्य कामांचे ओझे अशा अनेक समस्या शिक्षण क्षेत्रात असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वय समितीने पुकारलेल्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविला.

शैक्षणिक समस्यांवर सकारात्मक निर्णय शासन स्तरावरून होत नसल्याने आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, या समस्यांवर उचित निर्णय न झाल्यास लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी ध्यक्ष विठ्ठल गवस यांनी दिला. शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या सर्व सदस्यांनी शाळांवर काळ्या फिती लावून कामकाज केले.

यावेळी धिकारी कार्यालय समोरील निदर्शने आंदोलनात ध्यक्ष विठ्ठल गवस, सरचिटणीस तुषार आरोसकर, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, राजू वजराटकर, प्रशांत मडगांवकर, सल्लागार नंदकुमार राणे, त्रिंबक आजगांवकर, सर्व तालुकाध्यक्ष, व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स