ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल, पोईपचा दहावीचा निकाल १०० टक्के.

सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल, पोईपचा दहावीचा निकाल १०० टक्के.

प्रकाशन: 13 May 2025 07:06 PM
वाचन संख्या 78

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. मालवण तालुक्यातील सौ. इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ ला या प्रशालेतून ५० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

प्रशालेतून प्रथम क्रमांक मितेश मंगेश मेस्त्री (८७.८०), द्वितीय क्रमांक श्रेया बाळा धुरी (86.२०), तृतीय क्रमांक वैदेही दीपक धुरी (८५.८०) या विद्यार्थ्यांनी पटकावला. एकूण विद्यार्थ्यांपैकी १४ विद्यार्थ्यांनी विशेष प्रवीण, २२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर उर्वरित १४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सचिव विलास माधव, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, सर्व विद्यमान संचालक, मुख्याध्यापक श्री. कुंभार व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स