ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
गोळवण कुमामे डिकवल येथील अनेकजण शिवसेनेत..!

गोळवण कुमामे डिकवल येथील अनेकजण शिवसेनेत..!

प्रकाशन: 16 Jun 2025 05:18 PM
वाचन संख्या 240

आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा प्रेरक प्रभाव असल्याची प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया.

पोईप | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल येथील उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रविवार, १५ जून रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याने प्रेरित व प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी गोळवण कुमामे डिकवल मधील विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिले.

मागील कित्येक वर्षे गोळवण कुमामे डिकवल मधील ग्रामस्थांना अपेक्षित विकास कामे न झाल्याने उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ व महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना सरचिटणीस दादा साईल, मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, जि. प. माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, मंदार लुडबे, बबन घाडीगावकर, प्रशांत परब, विकास परब, तुकाराम जाधव, मंगेश चव्हाण, सामाजी गावडे, नंदादीप नाईक, कमलेश प्रभू व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, गोळवण मधील विकास कामाप्रसंगी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता गणेश चतुर्थी पूर्वी व काही कामे पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आमदार निलेश राणे व आपल्या मतदारसंघात चांगला समन्वय निर्माण झाला असून आगामी काळात मालवण तालुक्यात किमान ५०० तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. गोळवण मधील ग्रामस्थांनी आपल्यावर व पक्षावर दाखविलेला विश्वास आपण सार्थकी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, अनिल कांदळकर, दादा नाईक यांनी शिवसेना पक्ष धोरणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

प्रवेश कर्त्यांमध्ये आनंद गावडे, शंकर गावडे, तुकाराम गावडे, श्रीकृष्ण तेली, रमेश गावडे, रघुनाथ गावडे, बाबाजी गावडे, दुर्वेश गावडे, ऋषी गावडे, अथर्व गावडे, महादेव गावडे, राकेश गावडे, प्रवीण चिरमुले, विशाल घाडी, अरविंद घाडी, संतोष घाडी, सुभाष मालंडकर, महेश घाडी, अजित घाडी, ज्ञानदेव घाडी, हितेश घाडी, सुरेश घाडी, मंगेश घाडी, विजय घाडी, शांताराम थवी, अनंत थवी, पद्माकर थवी, विकास परब, तुकाराम जाधव, दीपक जाधव, श्रीकृष्ण तेली, प्रशांत परब, प्रवीण शिवलकर, नंदादीप नाईक, बाबुराव चिरमुले, राजेंद्र गावडे, सुनील गावडे, महेंद्र चव्हाण, रामचंद्र मेढेकर, सागर जाधव, रमेश जाधव, सत्यवान जाधव, चंद्रकांत कोंडसकर, आनंद चव्हाण, संकेत चव्हाण, बाळा गोळवणकर, विजय परब, दया राणे, दया चव्हाण, मनोज चव्हाण, रामचंद्र सावंत, श्याम चिरमुले, गौरव चिरमुले, रोहन देसाई, वसंत गोळवणकर, संकेत चव्हाण, मंगेश अपराध, रमेश गावडे, संदीप गावडे, एकादशी गावडे, सुरेखा नाईक, सुलक्षणा परुळेकर, शुभांगी नाईक, धनश्री देसाई, विभा परब, सुनंदा खरात, अनिता गोळवणकर, गणेश गावकर, अरुण रावले, संतोष चव्हाण, सचिन रावले, मनीष जाधव, अमित घाडीगावकर, सचिन गावडे, यशवंत साळकर व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा नाईक, प्रास्ताविक विकास परब यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स