ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे अविरत १९ व्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव समारंभ संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे अविरत १९ व्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव समारंभ संपन्न.

हडी येथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे अविरत १९ व्या वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव समारंभ संपन्न.

Article image

पोईप | प्रतिनिधी :  फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने गावातील दहावी, बारावी, पदवी, स्पर्धा परीक्षा यातील ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव कार्यक्रम हडी जठारवाडी शाळा येथे आयोजित करण्यात आला. हे या उपक्रमाचे अविरत १९ वे वर्ष ठरले.


कार्यक्रमाचा प्रारंभ साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाला. यावेळी यावेळी माजी सभापती उदय परब, अध्यक्ष देविदास सुर्वे, सचिव सुभाष वेंगुर्लेकर, कोषाध्यक्ष प्रभाकर सुतार, सल्लागार चंद्रकांत पाटकर, किशोर नरे, कृषी सेवक विवेक रंगे, सोनाली कदम, शिक्षिका श्रीमती कुबल,श्रीमती मालंडकर, ओझर हायस्कूल मुख्या. दीपक जाधव, सदस्य नंदकुमार पाटील, प्रज्ञा तोंडवळकर, सीमा शेटये, दिनकर सुर्वे, नंदकुमार पाटील, रमेश कावले, गुरुनाथ गावकर, प्रभाकर चिंदरकर, किशोर नरे, राणे सर, आंगणे मॅडम, पोलीस पाटील तृप्ती हडकर, दिनेश सुर्वे, श्रीमती पांजरी तसेच ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.


मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले. अध्यक्ष देविदास सुर्वे यांनी सर्वाँचे स्वागत केले.  प्रस्ताविक व आभार प्रदर्शन चंद्रकांत पाटकर यांनी केले. फेस्कॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडी यांच्या उपक्रमाच्या अविरत १९ वर्षांच्या यशस्वितेची विविध स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स