विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात.
विरण येथे राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात.
जि. प. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर आणि राकेश परब यांच्या हस्ते उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातल्या चुनवरे गावचे सुपुत्र, राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने विरण बाजारपेठ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर आणि राकेश परब यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संबोधित करताना अनिल कांदळकर म्हणाले की रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करणे अत्यंत भूषणावह आहे. एका व्यक्तीचे रक्तदान हे कोणाचे तरी जीवन वाचवू शकते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश परब हे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याला आणि भावी वाटचालीसाठी अनिल कांदळकर यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.
यावेळी मसदे सरपंच शमिका वाडकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, विरण सोसायटी अध्यक्ष रामदास पांजरी, माजी सरपंच आपु आंबेरकर, मालोंड माजी उपसरपंच जितेंद्र परब, बाबू आंगणे, किरण प्रभू, राजेश पाटील, देवेश नारकर, विशाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग रक्तपेढीच्या डॉ. उन्नती लडकत, सुमंगल बगडे, सौरभ शिंदे, जोसेफ पिंटो, जान्हवी तायशेट्ये, श्रीम. काजल परब, मिलिंद कांबळे, सागर सावंत, प्रथमेश घाडी, नितीन गावकर, दिनेश आंगणे, सचिन आंगणे, अरुण मेस्त्री, श्री. धुरी, मोहन पांजरी, बापू माडये, गणेश नेरूरकर, राजू बेलवलकर, प्रवीण पांजरी, सिद्धेश माड्ये, संतोष मुणगेकर, मनिष परब, बाबू वाडकर, बाळू जंगले, मुकेश नार्वेकर, प्रकाश परब, बाळा परब, संतोष घाडीगावकर, दिपक भोगले, राजू परब, एकनाथ परब, संदिप सावंत, महेश पालव, विजय सकपाळ, भाई घाडीगावकर, अनिल पालव यांच्यासह अनेक रक्तदाते, रिक्षा संघटना सदस्य आणि राकेश देसाई मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. राकेश परब यांनी सहकार्य केलेल्या सर्वांची प्रशंसा केली व आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...
या लेखाचे विभाग
लोकप्रिय टॅग्स
ताज्या बातम्या