ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह  सापडला.

बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह सापडला.

प्रकाशन: 09 Jul 2025 03:09 PM
वाचन संख्या 263

मालवण | ब्यूरो न्यूज : मेढा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश वाघ या मच्छिमाराचा मृतदेह दुपारी दांडी किनाऱ्यावर दिसून आला आहे. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

मेढा समोरील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका वारा आणि लाटांच्या तडाख्यात पलटी झाली. यात तीन मच्छिमार समुद्रात पडले. दोघेजण वाचले तर जितेश वाघ हा बेपत्ता झाला होता. काल मंगळवार ८ जुलै रोजी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. या दरम्यान पालकमंत्री सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात राहून शोध व बचाव कार्याचा आढावा घेत होते.

९ जुलै रोजी, दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान दांडी किनारी जितेश वाघ याचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना आढळून आला.

सौजन्य : मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स