ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुडाळ शहरात रस्ते,गटार,संरक्षण भिंत अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम.

कुडाळ शहरात रस्ते,गटार,संरक्षण भिंत अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम.

प्रकाशन: 29 Oct 2021 12:07 AM
वाचन संख्या 44

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर

कुडाळ | ब्युरो न्यूज : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी व नगरोत्थान निधीतून कुडाळ शहरात रस्ते, गटारांचे बांधकाम,संरक्षण भिंत अशी विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत. या कामांची भूमिपूजने आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. विकासाच्या बाबतीत कुडाळ शहर अग्रेसर बनवायचे आहे. कुडाळ शहरात याआधीही अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असून कुडाळ वासियांच्या मागणीनुसार नव्याने कोट्यवधींची कामे मंजूर करून घेतली आहेत.येत्या काळातही शासनाच्या प्रत्येक योजनेतुन जास्तीत जास्त निधी मतदार संघात आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. यामध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वक्रतुंड कॉमप्लेक्स येथे संरक्षण भिंत बांधणे, हेरेकर घर ते कुलकर्णी चाळीपर्यंत गटार बांधणे, शिरहट्टी सर घर ते वेतुरेकर घरापर्यंत गटार बांधणे व गटरावर फरशा बसविणे, आरोलकर घर ते पाटकर घरापर्यंत दुतर्फा गटार बांधणे, रेल्वे स्टेशन ते मस्जिद मोहल्लापर्यंत दुतर्फा बंधिस्त गटार बांधणे, कुडाळ सांगीर्डेवाडी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व गटार बांधणे, कुडाळ लक्ष्मी मंदिर ते आळवे घरापर्यंत गटार बांधणे याकामांची भूमिपूजने करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे, तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, राजू गवंडे, सुशील चिंदरकर, रुपेश पावसकर, सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर,मेघा सुकी, नितीन सावंत,संदीप म्हाडेश्वर, कृष्णा तेली, योगेश धुरी, चेतन पडते,साईश घुर्ये, तेजस्वी परब,अनिल राणे, विजय परब, उदय मांजरेकर, विलास राणे, अर्जुन परब, चंद्रशेखर बाईत, सत्यवान कांबळी, ईजाद नाईक, कादर खान, नागेश दळवी, विठोबा चव्हाण, दीपक राणे, भरत चव्हाण, सदाशिव राणे, प्रदीप राणे, आदिंसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स