ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र गरजू करणार लाक्षणिक उपोषण ..!

प्रधानमंत्री आवास योजनेतील अपात्र गरजू करणार लाक्षणिक उपोषण ..!

प्रकाशन: 28 Oct 2021 11:56 PM
वाचन संख्या 32

ओरोस | प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) प्रपत्र ड लाभार्थी यादीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १६ हजार लाभार्थी केंद्र शासनाच्या चुकीच्या निकषामुळे अपात्र ठरले आहेत . सदर अपात्र यादीतील गरजू गरीब कुटुंबांना यादी मध्ये स्थान मिळणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे . यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  ८ नोव्हेंबर २०२१ रोजी  शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना कुडाळ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे .  या बाबतचे निवेदन  संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . यावेळी कुंदे सरपंच सचिन कदम , पावशी सरपंच बाळा कोरगावकर , नेरूर सरपंच शेखर गावडे , हुमरस सरपंच अनुप नाईक , पावशी उपसरपंच दीपक आंगणे उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स