कवयित्री सरिता पवार यांच्या 'राखायला हवी निजखूण' काव्यसंग्रहाला विशाखा पुरस्कार प्रदान.
कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रच्या वतीने देण्यात येणारा विशाखा पुरस्कार विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठच्या नाशिक येथील सभागृहात ३० जून रोजी विशाखा काव्यपुरस्कार पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रदान करण्यात आले. सन २०१८ ते सन २०२४ या सात वर्षांतील एकूण २२ साहित्यिकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी प्रकुलगुरु प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, कुसुमाग्रज अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला सन २०२२ सालसाठीचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)