मसुरेत मोहरम निमित्त ताबूत मिरवणूक.
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे येथे मुस्लिम धर्मियांच्या मोहरम उत्सवाची सांगता रविवार, ०६ जुलै रोजी झाली. मोहरम निमित्त मसुरे बाजारपेठ येथील रफिक शाह वल्ली मोहल्ला आणि मसुरे भरतगड पायथ्या खालील चिस्ती मोहल्ला व मसुरे पेमवडे अशा एकूण तीन ताबूतांची मिरवणूक काढण्यात आली. मसुरे येथील मुख्य बाजारपेठ, मर्डे, पेमवडे मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी मिरवणूक प्रसंगी भेट दिली.
यावेळी मसुरे पोलीस अंमलदार संजय हुंबे, काँस्टेबल तुषार वाघाटे, श्री. सूरज रेडकर, पोलीस पाटील सौ. प्राजक्ता पेडणेकर, एशाबी सय्यद, होमगार्ड तसेच मसुरे, पेमवडे, सय्यदजूवा येथील मुस्लिम बांधव, महिला, हिंदू बांधव उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)