शिवसेनेची बांधणी व्यापक सशक्ततेकडे… !
सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी हिवाळे येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या पक्षप्रवेशादरम्यान आमदार निलेश राणेंच्या व्हीजन आणि कार्यतत्परतेची केली प्रशंसा.
कुडाळ – मालवणच्या विकासासाठी पक्षाच्या माध्यमातून कटीबद्धतेचा पुनरुच्चार..!
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी हिवाळे येथील भव्य पक्षप्रवेशादरम्यान आमदार निलेश राणेंच्या व्हीजन व कार्यतत्परतेची माहिती देत प्रशंसा केली आहे. असे अभ्यासू नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या रूपाने मालवण कुडाळ मतदारसंघाला लाभले आहे आणि त्यांनी सहा महिन्यातच हजारो कोटी विकासनिधी मतदारसंघात खेचून आणला असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.
श्री. दत्ता सामंत ( शिवसेना जिल्हाप्रमुख )
यावेळी शिवसेना पक्षाच्या बांधणीबाबत व वाढत असलेल्या व्यापकतेबाबत, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत म्हणाले की, विकासकार्यावर प्रेरित होऊन मालवण कुडाळ तालुक्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशांचा धडाका सुरु आहे. आगामी काळातही विकासकामे व पक्ष प्रवेशाचा धडाका असाच कायम राहील. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण – कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कटीबद्ध आहोत. ह्या कृती आधारित भावना त्यांनी हिवाळे श्री देव गांगेश्वर मंदिर येथे बोलताना स्पष्ट केल्या.
शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाची हिवाळे येथील गावभेट श्री देव गांगेश्वर मंदिर येथे माजी सभापती सुनील घाडीगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांच्या पुढाकारातून उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी हिवाळा गावातील उबाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व नूतन प्रवेश कर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हा प्रमुख महेश राणे, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, उद्योजक सुशांत घाडीगावकर, शिवसेना तालुका प्रवक्ते निलेश बाईत यांसह हिवाळे माजी सरपंच विश्वास परब, माजी सरपंच चंद्रकांत पवार, नयन कुळकर्णी, प्रदीप मेस्त्री, काका गावडे, पुरुषोत्तम धुरी, विजय पवार, तुळशीदास पवार, जनार्दन रामचंद्र पवार, प्रशांत परब, अभि लाड, मकरंद राणे, चंद्रकांत पवार, गोपी लाड, मठ सरपंच बाळा वेंगुर्लेकर, बुधवळे सरपंच संतोष पानवलकर, निरोम सरपंच राजू राऊत निरोम, नंदू आंगणे, मिहीर राणे, कृष्णा बाईत, बबन परब, अरविंद साटम, मंदार लुडबे, शानू वालावलकर यांसह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. श्री देव गांगेश्वर मंदिर संपूर्ण परिसर गर्दीने भरून गेला होता.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, मी खासदार राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे. तसेच आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेची सेवा करायची आहे. जन हिताच्या व गाव हिताच्या दृष्टीने काम करतं असताना गावातच शिवसेना पदाधिकारी यांनी एकत्रित सर्व निर्णय घ्यावेत. जनतेचे प्रश्न प्राध्यान्याने सोडवण्यावर भर असला पाहिजे. यापूर्वी गावाला पुढे करून ज्यांनी उमेदवारी घेतली, पदे घेतली त्यांनी आपल्या भोवती पदाचा आणि सत्तेचा वापर केला. त्यावर, ‘आम्ही भाष्य करणार नाही जनता योग्य वेळी उत्तर देईल…,’ ….मात्र आमच्या शिवसेनेत स्थानिक पदाधिकारी हेच आमचे प्रमुख. शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद असेल. गावचा विकास हाच केंद्रस्थानी राहील. गावातील वाहून गेलेला साकव याची उभारणीसाठी आमदार निलेश राणे यांनी ३ लाख निधी तात्काळ स्वखर्चातून दिला. हिवाळे गावाच्या विकासासाठी यापुढे शिवसेना कटीबद्ध आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सर्व विकासकामे पुर्ण केली जातील. शिक्षण, आरोग्य सेवा सुविधा, दूध उत्पादन वाढ करून त्यातून रोजगार निर्मिती यावर आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिक लक्ष दिले जाणार आहे. गावात ग्रामस्थांनी सांगितलेली सर्व विकासकामे पुर्ण केली जातील. असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण कुडाळ मालवण मतदारसंघात शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वितरण केले जाणार आहे. तर पुढील वर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरण केले जाईल. गरजू रुग्णांना आरोग्य उपचार आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी ही आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहणार असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. तसेच हिवाळे गावाचे विशेष कौतुक करतं या गावाने अनेक कलावंत दिले असल्याचे सांगत दशावतार कलावंत पुरुषोत्तम खेडेकर यांचे कौतुक केले. दशावतार या कलेला राजाश्रय मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे प्रयत्नशील असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल म्हणाले की, महाराष्ट्रात आमदार निलेश राणे यांचे वादळ घोंगावत आहे. त्यांची विधानसभेतील अभ्यासपूर्ण भाषणे जनता अनुभवत आहे. मागील दहा वर्षात कुडाळ मालवणची वाताहत झाली होती. आपला सर्वोत्तम जिल्हा मागास राहिला होता. मात्र आता आमदार निलेश राणे यांच्या विजय नंतर विकासाला सर्वोच्च गती प्राप्त झाली. आमदार निलेश राणे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची खंबीर साथ लाभली. माणगाव खोऱ्यात दत्ता सामंत यांनी चमत्कार केला. दोन्ही तालुक्यात अनेक गावा गावात संघटना मजबूत केली. आगामी काळात खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनात पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यातून तसेच आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ तालुका गतिमान राहील. पाच वर्षात मालवण कुडाळ अग्रेसर असेल. तसेच पुढील २५ वर्षे मालवण कुडाळचे आमदार निलेश राणेच असतील. असे आमदार लाभले हे आम्हा सर्व जनतेचे भाग्य आहे. असेही दादा साईल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत पवार यांनी केले. तर सूत्रसंचालन गोपी लाड यांनी केले.
यावेळी , गीतेश खेडेकर, हिवाळा शाखाप्रमुख संतोष (गोट्या) गावडे, अमोल लाड, समीर परब, अमित मेस्त्री, सचिन मेस्त्री यांसह संतोष अविनाश गावडे, सायली संतोष गावडे, श्रुती संदीप गावडे, हर्ष संतोष गावडे, हरीचंद्र सोम गावडे, तारामती हरीचंद्र गावडे, प्रतीक्षा खेडेकर, संतोष हरी घोगळे, प्रथमेश गावडे, बंटी गावडे, विष्णु कार्डोज, रवी करडोज, विलास गावडे, दादा गावडे, रमेश परब, प्रणय परब, हरिश्चंद्र परब, सचिन चव्हाण, समीर मेस्त्री, शांताराम शिंदे, पुरुषोत्तम लक्ष्मण धुरी, सुभाष चव्हाण, भाई चव्हाण, नितीन गावडे, अर्चना गावडे, संदीप गावडे, भाऊ मेस्त्री, उमेश मेस्त्री, लक्ष्मण पांचाळ, सूचित पवार, दीपक पवार, साळस्कर, समीर मेस्त्री, कृष्णा मेस्त्री, वृषभ चव्हाण, बाबा बांदिवडेकर, बाबू परब, सोहम चव्हाण, गोविंद चव्हाण, अक्षय गावडे, प्रभाकर पवार, प्रांजली पवार, प्रशांती पवार, विलास गावडे, जय गावडे, अच्युत मेस्त्री, रुपेश परब, श्रीराम मेस्त्री, सिद्धेश परब, प्रकाश परब, अंकुश परब, अभि शिंदे, हर्ष जंगले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला अशी माहिती मिळत आहे.
सौजन्य : मालवण ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)