ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

कणकवली व कुडाळ येथील बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Article image

'फिडे' मानांकित खेळाडू तनिष्का आडेलकर, चेतन भोगटे, कार्तिकेय चव्हाण आणि मीनल सुलेभावी यांची पंच म्हणून जबाबदारी.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : जागतिक बुद्धिबळ दिन( २० जुलै )निमित्त श्री चेस अकॅडमी, कणकवली आणि नवजीवन चेस अकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली व कुडाळ येथे विशेष बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात १०० हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जागतिक बुद्धिबळ दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभाला श्री. साटेलकर, सीआयडी विभागाचे अधिकारी देसाई, राजेंद्र तवटे, श्री. म्हापसेकर, श्री. घाडी , सुयोग धामापूरकर, श्रीकृष्ण आडेलकर, बळीराम आडेलकर , डॉ. रावण आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे महत्त्व, एकाग्रता, संयम, नियोजन आणि अभ्यासातील उपयोग याविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना नियमित सराव करण्याचे आवाहन केले.


स्पर्धेचे यशस्वी व शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी फिडे रेटेड खेळाडू तनिष्का आडेलकर, चेतन भोगटे, कार्तिकेय चव्हाण आणि मीनल सुलेभावी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. 

Article image


स्पर्धेनंतर सर्व सहभागी खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्यांसह प्रत्येक स्पर्धकाच्या सहभागाची प्रशंसा करण्यात आली. 


निकाल खालील प्रमाणे आहेत.


कुडाळ केंद्रावर ६ वी ते १२ गटात वसंत गवस (सावंतवाडी), अनुज व्हनमाने (कुडाळ), विराज सामंत (कुडाळ), दीपल आचरेकर (कुडाळ) , सन्मिल साटेलकर (वेंगुर्ला) आणि १ ली ते ५ वी गटात दीपांशु दळवी (सावंतवाडी), समर्थ गावडे (मालवण), गार्या साटेलकर (सावंतवाडी) , हर्ष माइनकर (कुडाळ), मेधा देसाई (सावंतवाडी) या प्रथम पाच क्रमांक प्राप्त केले.      


कणकवली केंद्रावर १ ली ते ५ वी गटात स्वयम वालावलकर (कणकवली), स्वानंद आमडोसकर (कणकवली), अभिराज हुले (कणकवली), मंथन खेत्री (कणकवली), सोहम लाड (ओरोस) आणि ६ वी ते १२ वी गटात साइराज मोटे (कणकवली), लौकिक मुंडले (कणकवली), नील अवसरे (कणकवली), कार्तिकेय चव्हाण (कणकवली), काव्या पारकर (कणकवली) या मुलांनी प्रथम पाच क्रमांक प्राप्त केले आहेत.जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित पालक, खेळाडू आणि मान्यवरांनी व्यक्त केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स