ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.

Article image


ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची, अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकी जागेतील जेष्ठ व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी समाज सेवक संजय मालंडकर यांच्या उपस्थितीत भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते व गाळे धारक राजेंद्र मनोहर पेडणेकर, समाज सेवक संजय मालंडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील सर्वांगीण वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.


यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर व संजय मालंडकर यांनी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकी जागेतील जीर्ण इमारती संदर्भात चर्चा केली. यावेळी, इमारत व जागे संदर्भात सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली अशी माहिती श्री. पेडणेकर यांनी दिली आहे तसेच मागिल भेटी दरम्यान सांगितले प्रमाणे इमारती मधील, तसेच सर्व खोके धारकांची तपशीलवार माहितीची फाईल सादर करण्यात आली असेही श्री. पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.


या २० जुलै २०२६ रोजी झालेल्या भेटीबद्दल कळवताना राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सांगितलंय की, त्यावेळच्या निवेदनात, कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे असलेले नगरपंचायत मालकीचे व्यापारी मार्केट ( पुर्वी चे भाजी मार्केट) मधील स्लॅब ची इमारत पूर्णतः कोसळण्याच्या मार्गावर असून, पहिल्या मजल्यावरील भिंती, छप्पर सुध्दा कोसळून पडले आहे. तसेच एका बाजूने स्लॅब सुध्दा कोसळला असून, इमारत धोकादायक बनली आहे, या मध्ये एकुण १३ + पहिल्या मजल्यावर '३ + १ पत्रा शेड' असे एकूण १७ गाळे धारक आहेत. त्याचप्रमाणे ३६ खोके धारक असून या सर्वांची नगरपंचायत मध्ये नोंद असून सर्व वेळोवेळी भाडे भरणा करत आहेत. १० ते १५ वर्षे येथील गाळे भाड्याने घेऊन जे व्यवसाय करत आहेत , त्यांचा ही विचार केला जावा आणि आपणास विनंती आहे की आपण प्रत्यक्षात पाहणी करावी असे नमूद करण्यात आले असून लवकरात लवकर या जागेवर नवीन व्यापारी संकुलण उभारणी करावे, आणि आम्हाला नवीन व्यापारी संकुलना मध्ये समाविष्ट करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनात, नवीन होणाऱ्या संकुलात, नवीन नियमानुसार आवश्यक अनामत रक्कम, नव्याने लागू होणारे भाडे भरण्यास तयार आहोत असेही नमूद करण्यात आले असल्याचे श्री. पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.


सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी भेटीसाठी कामाच्या व्यग्रतेतून तसेच भरगच्च वेळापत्रकातुन या भेटीसाठी त्यांचा बहूमूल्य वेळ दिल्याबद्दल तसेच सविस्तर माहिती जाणून घेतल्याबद्दल आणि लवकरच आपण कणकवली मध्ये येवून पाहणी करू असे आश्वस्त केल्याबद्दल राजेंद्र मनोहर पेडणेकर व संजय मालंडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या प्रती विशेष कृतज्ञापर आदर व्यक्त केला आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स