ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी नवनाथ झोरे नियुक्त.

सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी नवनाथ झोरे नियुक्त.

प्रकाशन: 03 Jul 2025 11:14 AM
वाचन संख्या 211

मालवण | ब्यूरो न्यूज : सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी नवनाथ लक्ष्मण झोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी याबाबतचे नियुक्तीपत्र नवनाथ झोरे यांना दिले आहे.

नवनाथ झोरे यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाची नोंद घेऊन त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही काही ठिकाणी अजूनही वीज, रस्ते या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कुठे तरी या समाजावर अन्याय होत असल्याची भावना असून आपण तालुक्यातील वाड्या वस्त्यामध्ये फिरून तिथल्या समाजाच्या अडचणी समजून घेऊन त्या सरकार समोर मांडणार आहोत. काही ठिकाणी धनगर वस्त्यांना आजही रस्ते, वीज, नाही या मूलभूत सुविधावर लक्ष केंद्रित करून या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनाथ झोरे यांनी निवडीनंतर म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स