महाराष्ट्राचे अरण्यॠषी पद्मश्री मारुती चितमपल्ली कालवश.
पक्षीकोश , प्राणीकोश व ‘मत्स्यकोश’ लेखनाद्वारे मराठी साहित्यात अनेक शब्दांची घातली होती भर.
कोमसाप जिल्हा समन्वयक रुजारीओ पिंटो व कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर आणि वाहिली श्रद्धांजली.
ब्यूरो न्यूज : ज्येष्ठ साहित्यिक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित निसर्गमित्र मारुती चितमपल्ली यांचे १८ जून रोजी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ते महाराष्ट्राचे अरण्यकऋषी म्हणून ओळखले जात.
वन विभागात कार्यरत असताना त्यांनी पक्षी, प्राणी व वन्यजीवांविषयी संशोधन केले. त्यांच्या पक्षीकोश, प्राणीकोश व मत्स्यकोश लेखनाद्वारे मराठी साहित्यात अनेक शब्दांची भर पडली.
त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि निसर्गप्रेमींसह विविध क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हे वृत्त समजताच, कोकण मराठी साहित्य परिषद तथा कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक रुजारीओ पिंटो व कोमसाप मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर तसेच साहित्यिक, त्यांच्या निधना बद्दल डिजिटल समूह मंचाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)