मसुरे गावचे सुपुत्र नंदकिशोर परब यांची कल्याण जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड.
मसुरे | प्रतिनिधी : भाजपाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष, डोंबिवलीचे आमदार, माजी मंत्री तसेच महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षांच्या नावांच्या घोषणा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यामध्ये मालवण तालुक्यातील मुळ मसुरे गावचे सुपुत्र श्री. नंदकिशोर घनश्याम परब यांची भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मुंबई डोंबिवली या ठिकाणी आपल्या राजकीय कार्याचा श्री गणेशा माजी मंत्री तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला होता. अनेक वर्षे सामाजिक कार्य तसेच भारतीय जनता पक्षाची विविध पदे भूषविली. राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा,आरोग्य अशा क्षेत्रांमध्ये मसुरे गावासहित कल्याण डोंबिवली मध्ये नंदू दादा परब यांनी योगदान दिले आहे.
यावेळी बोलताना नंदू दादा परब म्हणाले, भारतीय जनता पक्ष तसेच वरिष्ठ नेतृत्व आणि आदरणीय माजी मंत्री आणि मार्गदर्शक तसेच महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडताना निश्चितच पक्षाला अभिमान वाटेल, वरिष्ठ नेत्यांना गर्व वाटेल असं कार्य माझ्या हातून घडेल. तसेच कल्याण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी तळमळीने काम केले जाईल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष जिल्ह्यामध्ये त्र दिसेल.
नंदू दादा परब यांच्या निवडीबद्दल मसुरे गावातून अभिनंदन करण्यात येत आहे. लवकरच त्यांच्या मसुरे गावी मसुरे ग्रामस्थांच्या वतीने एक नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)