ताज्या बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन. श्री भैरवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्त भजन महोत्सव. व्हाॅइस ऑफ मीडिया दोडामार्गच्या वतीने श्रमदानातून बंधारा. ‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...!
मालवण नगरपरिषदेतर्फे जलसंधारण दिन उत्साहात साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदेतर्फे जलसंधारण दिन उत्साहात साजरा.

मालवण नगरपरिषदेतर्फे जलसंधारण दिन उत्साहात साजरा.


Article image


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेतर्फे २१ ऑगस्ट २०२६ रोजी जलसंधारण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 'जलसंधारणाचे महत्त्व, पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती' अशा विविध उद्देशांनी मालवण नगरपरिषदेतर्फे हा विशेष दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने, मालवणच्या रॉक गार्डन येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत आग्रही नागरिक उपस्थित होते.


यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जलसंधारणासोबतच वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्मरण करण्यात आले. या दरम्यान 'पाणी वाचवा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा' हा खास संदेश देत उपस्थितांनी जलसंधारण व पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प केला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मालवण नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात मालवणच्या लोकप्रतिनिधी मान्यवरांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखिल 'पर्यावरण संवर्धन प्रोत्साहक' व प्रशंसनीय ठरला अशी माहिती मालवण नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. पर्यावरणप्रेमींनी मालवण नगरपरिषद व या कार्यक्रमा संबंधित सर्व घटकांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स