ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे हायस्कूलचा 'बांधावरची शाळा' उपक्रम उत्साहात.

मुणगे हायस्कूलचा 'बांधावरची शाळा' उपक्रम उत्साहात.

प्रकाशन: 02 Jul 2025 01:53 PM
वाचन संख्या 291

मसुरे | प्रतिनिधी : शिक्षण हे वर्गात बसून जसे घडते तसेच निसर्गाच्या सान्निध्यात देखिल घडणारे असेल तर विद्यार्थ्यांना आणखी जवळून शैक्षणिक अनुभव देऊ शकते, अशा उद्देशाने देवगड तालुक्यातील श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे कृषिदिना निमित्त ‘बांधावरची शाळा’ उपक्रम संपन्न झाला.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील शेती विषयक धडे थेट निसर्गाच्या सान्निध्यात – म्हणजेच शाळेच्या शेजारच्या शेतात नेऊन समजावण्यात आले.

यामध्ये नांगरणी, लावणी, खत मात्रा कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपक्रमानंतरच्या विविध अभिप्रायांतून प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका कुंज यांनी ‘बांधावरची शाळा’ ही अनुभवात्मक शिक्षणाची एक प्रभावी पद्धत असल्याचे नमूद केले.

यावेळी गौरी तवटे, हरिदास महाले, प्रसाद बागवे, रश्मी कुमठेकर,नामदेव बागवे, स्वप्नील कांदळगावकर, सुविधा बोरकर, मनोज मुणगेकर उपस्थित होते. या उपक्रमाला ग्रामस्थ पुरुषोत्तम सावंत, रवी सावंत, सावंत यांचे सहकार्य लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स