ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
खारेपाटण येथे रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचा पदग्रहण सोहळा संपन्न.

खारेपाटण येथे रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचा पदग्रहण सोहळा संपन्न.

प्रकाशन: 24 Jun 2025 09:57 PM
वाचन संख्या 150

कणकवली | ब्यूरो न्यूज : खारेपाटण हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचा पद अधिकार ग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी क्लबचे डीस्ट्रिक ऑफ गव्हर्नर डॉ. शरद पै यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थिनी कु. अनुश्री तळगावकर हिच्या शिव नृत्याने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या प्रेसिडेंटपदी रोट्रियन श्री. दयानंद कोकाटे, सेक्रेटरीपदी रोट्रियन श्री. अजय गुरसाळे तर ट्रेझरियनपदी रोट्रियन श्रीम. सारिका महिंद्रे यांची सर्वानुमते निवड करून त्यांना पदाधिकार देण्यात आला. यावेळी खारेपाटण रोटरी क्लबच्या २५ मेंबर्सना देखील रोट्रियन पदवी देऊन गौरविण्यात आले. तसेच या कार्यक्रमात खारेपाटण येथील रहिवासी श्री. राजेंद्र ब्रम्हदंडे यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी सौ. वीणा ब्रम्हदंडे यांच्या मृत्यू नंतर देहदान करून समजला एक वेगळा आदर्श घालून दिल्याबद्दल त्यांच्या कुटंबिंयाचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थी कु. रेवण राऊळ याने शालेय स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ.शरद पै, नूतन अध्यक्ष श्री. दयानंद कोकाटे, रोट्रियन श्री. संजय रावराणे, डॉ. विद्याधर तायशेटे, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, श्री महादेव पाटकर यांनी मनोगते व्यक्त केली. तर PHG मध्ये चांगले काम केल्याबद्दल वैभववाडी रोटरी क्लबच्या ७ तर देवगड रोटरी क्लबच्या ४ रोट्रीयनचा डीस्ट्रीक गव्हर्नर डॉ. शिरीष पै यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष श्री. प्रशांत गुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला रोट्रियन फर्स्ट लेडी श्रीम. पद्मजा पै, रोटरीचे जिल्हा सचिव राजेश घाटवळ, प्रणय तेली, खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, डॉ. विद्याधर तायशेटे, महादेव पाटकर, संजय रावराणे, खारेपाटण माजी जि.प.सदस्य श्री. रवींद्र जठार, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, खारेपाटण सिनियर कॉलेज प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण हायस्कूल मुख्याद्यापक श्री. संजय सानप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातून सर्व रोटरी सदस्य व खारेपाटण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. विद्याधर सावंत, प्रमुख पाहुण्यांची ओळख स्नेहल खांबल, प्रास्ताविक प्रशांत गुळेकर यांनी केले तर आभार रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे सेक्रेटरी श्री. अजय गुरसाळे यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स