ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
स्वराज्य ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा आणि वादकांचा मेळावा उत्साहात.

स्वराज्य ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा आणि वादकांचा मेळावा उत्साहात.

प्रकाशन: 24 Jun 2025 09:36 PM
वाचन संख्या 81

मालवण | प्रतिनिधी : मालवणमध्ये स्वराज्य ढोल ताशा पथक यांचा वाद्यपूजन सोहळा व वादकांचा मेळावा मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत, कार्यकर्ते यतीन खोत आणि आचरा येथील मंदार सरजोशी यांच्या पौरोहित्याखाली वाद्यपूजन करण्यात आले.

व्यासपीठावर प्रमुख मान्यवर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर, तबला वादक व सामाजिक कार्यकर्ते सदा चुरी, सौ. चारुशीला आढाव तसेच कोल्हापूर स्वराज्य पथकाचे स्वप्नील चौगुले उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ वादक सौ. चारुशीला आढाव यांनी शंखनाद केला तसेच मालवणी गाऱ्हाणे घातले.

यावेळी विविध क्षेत्रातील वादक, सर्पमित्र, व्यवस्थापक, सामाजिक कार्यकर्ते व ‘शिवराज भूषण’ नाटकातील कलावंत, दिग्दर्शक अशा अनेक व्यक्तींचा गौरव करण्यात आला. स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या वादकांतर्फे सर्वेसर्वा सौ. शिल्पा खोत यांचा सत्कार करण्यात आला. या ढोल पथकातील वादक महेश वालीकर याला दहावीच्या शिक्षणासाठी उद्योजक सागर वाडकर यांच्याकडून देण्यात आलेली आर्थिक मदत यावेळी सुपूर्द करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व भजनसम्राट भालचंद्र केळुसकर यांनी स्वराज्य पथकाच्या कार्याविषयी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर वादकांनी केलेल्या ढोल ताशांचे वादन सादर केले.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवर आणि सौ. मिताली कोरगांवकर, मंदार सरजोशी, दादा वेंगुर्लेकर, संतोष लुडबे, डॉ. एम. आर. खोत, नितीन तोडणकर, लायन्स क्लबच्या अनुष्का चव्हाण, मनाली दळवी, अंजली आचरेकर, नंदिनी गांवकर, सुधीर गोसावी, निर्माते भूषण साटम, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, मालवण व आचरा येथील स्वराज्य ढोल पथकाचे सदस्य, वेतुरे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले तर आभार सौ. शिल्पा खोत यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स