ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भूतनाथ वायरी, चिंदर व आचरा ग्रामपंचायतीसाठी कायमस्वरूपी ग्राम अधिकाऱ्यांची मागणी.

भूतनाथ वायरी, चिंदर व आचरा ग्रामपंचायतीसाठी कायमस्वरूपी ग्राम अधिकाऱ्यांची मागणी.

प्रकाशन: 24 Jun 2025 10:20 PM
वाचन संख्या 170

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीसह चिंदर व आचरा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्राम अधिकारी मिळावा, अशी मागणी मंगळवार, २४ जून रोजी वायरी भूतनाथ, चिंदर व आचरा विभागातील काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. वायरी भूतनाथ, आचरा, चिंदर येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

यावेळी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि वायरी ग्रामपंचायत माजी सरपंच देवानंद लुडबे, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, मालवण तालुका सरचिटणीस तथा चिंदर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, वायरी भूतनाथ ग्रामपंचायत उपसरपंच प्राची माणगावकर, युवक काँग्रेसच्या जिल्हा सचिव पल्लवी तारी – खानोलकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सरदार ताजर, विठ्ठल तळवडेकर, पराग माणगावकर, दिलीप तळगावकर, चव्हाण यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबत तत्परतेने लक्ष घालून येत्या काही दिवसात कायमस्वरूपी ग्राम अधिकारी देणार असल्याचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स