ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मासेमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर.

मासेमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर.

प्रकाशन: 24 Jun 2025 10:35 AM
वाचन संख्या 39

जिल्ह्यातील ३०० नौका मालकांना मिळणार लाभ.

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र शासनाने मासेमार नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यन्वित केलेली आहे. यामध्ये नौकाधारकांनी मच्छिमारीसाठी वापरलेल्या डिझेल वरील मूल्यवर्धित कर परतावा देण्यात येतो. १९ जूनच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० मत्स्य सहकारी संस्थांच्या नौका मालकांना २ कोटी ३६ लाख १७ हजार ५५० एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

ही रक्कम २३ जून २०२५ रोजी पासून जिल्ह्यातील एकूण ३०० नौका मालकांच्या खाती VPDA प्रणाली अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे. मे २०२५ अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमार नौका धारक यांचा रु. ४ कोटी ३६ लाख ५ हजार ८१५ एवढा डिझेल परतावा प्रलंबित होता. प्रलंबित रक्कम लवकरात लवकर मंजूर करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी बंद असताना सदर परतावा अनुदान रक्कम मंजूर केल्याने मासेमार नौकाधाराकांनी शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स