ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.

राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.

राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.

Article image

महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत चर्चा.


Article image


मुंबई : महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे व ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार यांची ७ सप्टेंबर २०२६ रोजी सदिच्छा भेट झाली. ही भेट ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानी झाली.

Article image

या भेटीत मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी, मुंबईतील ससून डॉकच्या आधुनिकीकरणासंदर्भात मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनची माहिती दिली.  तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ची माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांना माहिती दिली.


महाराष्ट्र राज्यातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांचे हित आणि बंदरांच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत देखील यावेळी सविस्तर चर्चा झाली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.

लोकप्रिय टॅग्स