ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मालवणहून थेट बससेवेचा शुभारंभ.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मालवणहून थेट बससेवेचा शुभारंभ.

प्रकाशन: 23 Jun 2025 03:30 PM
वाचन संख्या 50

मालवण | ब्यूरो न्यूज : विद्यार्थी – विद्यार्थिनींची शैक्षणिक गैरसोय टाळून त्यांना सुलभ प्रवास करता यावा या उद्देशाने सुकळवाड ओरोस येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने मालवण मधून थेट बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ सोमवार, २३ जून रोजी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

ओरोस रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मालवणसह जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जात असून विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जात आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना एसटी प्रवासात होणारी अडचण लक्षात घेऊन कॉलेजच्या वतीने थेट मालवण ते कॉलेजपर्यंत बस सेवा सुरु करण्यात आली आहे.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, राकेश सावंत, अशोक सावंत, अक्षय परुळेकर, अपर्णा मांजरेकर, रोशनी वरक, अनिरुद्ध झांटये, भिकाजी जाधव, सुनील शिवगण, गितेश राणे, तेंडोलकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील अन्य भागातून देखील विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता भासल्यास अशा प्रकारे बस सेवा सुरु करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स