कणकवली तालुक्यातील शिक्षकांचा शिक्षक समितीतून प्राथमिक शिक्षक भारतीत प्रवेश.
कणकवली | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवलीचा मेळावा रविवार, २२ जून रोजी श्री. संतोष पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष श्री. संदेश सावंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह श्री. संजय वेतुरेकर, राज्यसंघटक श्री.किसन दुखंडे, जिल्हा सचिव मंगेश खांबळकर, श्री.संतोष कोचरेकर, श्री. श्रीराम विभूते, श्री. दशरथ शिंगारे, श्री. रामचंद्र डोईफोडे, श्री. रामचंद्र सातवसे, श्री. संजय कोळी, श्रीम. राधिका जगदाळे, श्रीम. नेहा गवाणकर तसेच सर्व तालुक्याचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप तांबे यांनी केले.
शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडीस यांच्यासोबत आनंद तांबे, विनायक जाधव, प्रशांत बोभाटे, महेंद्र पवार, संदीप तांबे, दिलीप धामापूरकर, कल्पना मलये, इंदू डगरे या प्रमुख कार्यकर्त्यांसह ११० शिक्षकांनी शिक्षक समितीतून शिक्षक भारतीत जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह श्री.संजय वेतुरेकर, श्री. संतोष पाताडे यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप तांबे यांनी केले तर श्री. संजय कोळी यांनी आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)