ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मसुरे येथील विक्रम मेहेंदळेचे नीट परीक्षेत यश.

मसुरे येथील विक्रम मेहेंदळेचे नीट परीक्षेत यश.

प्रकाशन: 21 Jun 2025 09:51 PM
वाचन संख्या 38

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गावचा रहिवासी विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे याने एमबीबीएस प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ५५० गुण मिळवत देशात १२,०८९ वी रॅंक प्राप्त केली आहे. विक्रम मेहंदळे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे गावातील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे प्रवेश घेतला होता. नीट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून त्याने मसुरे गावाचे तसेच भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्र परिवार, संस्थाचालक, शिक्षक व मसुरेवासीयांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. विक्रम मेहंदळे हा मसुरे येथील डॉ. सुधीर मेहंदळे यांचा नातू आणि डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, डॉ. विणा मेहंदळे यांचा मुलगा आहे.

विक्रम मेहंदळे याच्या यशाबद्दल उद्योजक डॉ. दीपक परब, कल्याण जिल्हा भारतीय जनता पक्ष अध्यक्ष नंदू परब, माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश परब, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळा गोसावी, उद्योजक दीपक सावंत, शाळा कमिटीचे अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, माजी जि.प. अध्यक्ष सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश बागवे, विलास मेस्त्री, मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, जगदीश चव्हाण, मसुरे ग्रामस्थ, भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग, कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स