ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जलसंपदा विकासमंत्री जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

जलसंपदा विकासमंत्री जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर..

प्रकाशन: 28 Oct 2021 04:34 PM
वाचन संख्या 46

ओरोस | प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे दि. 30 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दि. 30 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वा. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन, देवगड – जामसंडे येथे कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघ – राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक, सकाळी 10.30 वा. मोटारीने देवगड येथून कणकवलीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वा. कणकवली येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पाट्री कार्यालय कणकवली येथे, कणकवली तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालायचे उद्घाटन समारंभास उपस्थिती, सकाळी 11.30 ते 11.45 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय कणकवली येथे कणकवली तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश. सकाळी 11.45 ते 12.00 वा. कणकवली येथे राखीव. दुपारी 12.00 वा. मोटारीने कणकवली येथून कुडाळकडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. कुडाळ येथे आगमन. दुपारी 12.30 ते 2.00 वा. लेमन ग्रास हॉटेल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभाग आढावा बैठक व पत्रकार परिषद, दुपारी 2.00 ते 2.30 वा. राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वा. लेमन ग्रास हॉटेल कुडाळ येथे निमंत्रीत कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा राष्ट्रवादी कार्याकारिणी – राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक. दुपारी 3.30 ते 4.30 वा. लेमन ग्रास हॉटेल, कुडाळ येथे कुडाळ – मालवण विधानसभा मतदार संघ – राष्ट्रवादी परिवार संवाद आढावा बैठक. सायं. 4.30 वा. मोटारीने कुडाळ येथून बांदाकडे प्रयाण. सायं. 5.00 वा. बांदा येथे आगमन. सायं. 5.00 ते 5.30 वा.ओवेस कॉम्पलेक्स, बांदा येथे बांदा येथील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पूरजन्य परिस्थिती उपाय योजनेसाठी नौका सुपूर्त करण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. मोटारीने बांदा येथून सावंतवाडीकडे प्रयाण. सायं. 6.00 वा. सावंतवाडी येथे आगमन. सायं. 6.00 ते 7.30 वा. समर्थ कृपा हॉल, सावंतवाडी येथे सावंतवाडी – दोडामार्ग – वेंगुर्ला विधानसभा मतदार संघ आढावा बैठक. सायं. 7.30 वा. मोटारीने सावंतवाडी येथून कुडाळकडे प्रयाण. रात्री 8.00 वा. कुडाळ येथे आगमन. रात्री 8.50 वा. मत्स्यगंधा एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.

    


विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स