ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालिका विश्वातील 'हंबीरराव मोहिते' ऊर्फ अनिल गवस यांची कणकवलीत उद्या सुरु होणाऱ्या गावठी आठवडी बाजाराला प्रमुख उपस्थिती..!

मालिका विश्वातील 'हंबीरराव मोहिते' ऊर्फ अनिल गवस यांची कणकवलीत उद्या सुरु होणाऱ्या गावठी आठवडी बाजाराला प्रमुख उपस्थिती..!

प्रकाशन: 28 Oct 2021 06:40 PM
वाचन संख्या 32

कणकवली | उमेश परब : उद्यापासून कणकवली येथे सुरू होणाऱ्या गावठी आठवडी बाजाराला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतील हंबीरराव मोहिते यांची भूमिका निभावत असलेले अनिल गवस यांची प्रमुख उपस्थिती असणार असून या गावठी आठवडी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित राहणार आहेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बरेच महिने हा गावठी आठवडी बाजार बंद होता पण कुठेतरी कोरोणाचे नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा सदरचा गावठी आठवडा बाजार पूर्वी प्रमाणे दर शुक्रवारी भरवला जाणार आहे. यासाठी कणकवली पंचायत समितीने पुढाकार घेतला असून आज या आठवडी बाजाराच्या जागेची पाहणी करत आढावा पंचायत समिती सभापती मनोज रावराणे व पंचायत समिती अधिकारी यांनी घेतला आहे
यावेळी सभापती मनोज रावराणे यांनी
सांगितले की उद्या सुरू होणाऱ्या गावठी आठवडी बाजाराला खास स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधील हंबीरराव मोहिते यांची भूमिका निभावणारे अनिल गवस हे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार असून त्यांना पाहण्याची संधी समस्त कणकवली वासियांना मिळणार असून अनिल गवस यांनी बऱ्याच मालिका,नाटक , चित्रपट यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये आपली छाप उमटवली आहे आणि उद्या ते आपल्या कणकवलीत गावठी आठवडा बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी कणकवलीकर यांच्या भेटीला येणार असल्याने या उद्घाटनाला सर्व कणकवलीकर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सभापती मनोज रावराणे यांनी केले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स