ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
फणसगांव येथे नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गचा प्लॅस्टिक कचरा संकलनाचा उपक्रम संपन्न..!

फणसगांव येथे नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गचा प्लॅस्टिक कचरा संकलनाचा उपक्रम संपन्न..!

प्रकाशन: 28 Oct 2021 02:30 PM
वाचन संख्या 41

कणकवली | उमेश परब : नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गच्या स्वच्छ भारत अभियानमध्ये देवगड तालुक्यातील फणसगांव माध्यमिक विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगांव यांनी सहभाग घेतला. विठ्ठलादेवी येथील हे स्वच्छ भारत अभियान नेहरु युवा केंद्र देवगड सिंधुदुर्गच्या रीना दुदवडकर यांनी आयोजन केले. सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी विठ्ठलादेवी गावात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. गावाच्या विविध भागात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उंडिल तिठा, फणसगांव कॅन्टीन येथील प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन केले. फणसगांव विद्यालयाचे विद्यार्थी आणि कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगांवचे NSS स्वयंसेवक तसेच इतर विद्यार्थी या अभियानात सहभागी झालेले. सुमारे ५०-५५ विद्यार्थ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. विद्यार्थ्यांनी जवळपास ६३ किलो प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन केले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्वतःच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावाच पण इतर ठिकाणीही स्वच्छ्ता राखावी असा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवणारा संदेश मुख्याध्यापिका पूजा कोरगाःवकर यांनी केले.

यावेळी प्राचार्य ए. एम. ढेकणे, मुख्याध्यापिका पूजा कोरगावकर, नेहरु युवा केंद्र देवगड सिंधुदूर्ग च्या रीना दुदवडकर, NSS विभाग प्रमुख- पवार आर. पी., नारकर, चव्हाण मॅडम, पोळ, कोकरे, कदम, करंदीकर, पाटील, साटम, कल्पेश नारकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स