केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू होणार असल्याचे संकेत…!
ब्युरो न्यूज | विवेक परब : कोकणवासियांसाठी कोकण रेल्वे नेमकी किती उपयुक्त अशा चर्चा घडत असतात. उत्तर किंवा दक्षिणेकडे जाणार्या अनेक रेल्वेमध्ये कोकणवासिय व खासकरुन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणसांना जागा मिळवणे हे जड जाते कारण दोन्ही बाजुंनी येणार्या बहुतांश रेल्वे आधीच आरक्षित किंवा तिकीटरक्षित झालेल्या असतात .
यावर एक उपाय म्हणून महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेशजी राणे यांनी रेल्वे मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्याचे निवेदन दिले होते.
आता त्या निवेदनासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही पुढाकार मिळत असल्याने लवकरच वसई ते सावंतवाडी अशी खास कोकणची अशी रेल्वे सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)