ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
'एक जिल्हा एक उत्पादन' पॅकेजिंगवर अधिकृत लोगोचा वापर करावा - जिल्हाधिकारी अनिल पाटील.

'एक जिल्हा एक उत्पादन' पॅकेजिंगवर अधिकृत लोगोचा वापर करावा - जिल्हाधिकारी अनिल पाटील.

प्रकाशन: 12 Jun 2025 07:33 PM
वाचन संख्या 167

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अल्फान्सो मँगो आणि प्रोसेसड कॅश्यू या दोन उत्पादनांचा समावेश झालेला आहे. आपल्या जिल्ह्यातील सर्व ODOP उत्पादन विक्रेते, औद्योगिक समूह (क्लस्टर) आणि उद्योग घटकांनी त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंग वर अधिकृत लोगोचा वापर करावा. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस आंबा व काजू प्रक्रिया या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना स्थानिक व जागतिक बाजारपेठ मिळण्यास सहकार्य मिळेल. यामुळे ग्राहकांमध्ये उत्पादनाची दृश्यमानता, गुणवत्ता आणि खरेपणाची ओळख निर्माण होईल. तसेच ODOP उत्पादकांना बाजारपेठ मिळण्यास मदत होणार असल्याचे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामार्फत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याने एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमास चालना देण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविला असून राज्यामार्फत सर्व ३६ जिल्ह्यामधून ७२ प्रमुख ODOP उत्पादने अधिसूचित केली आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड अल्फान्सो मँगो आणि प्रोसेसड कॅश्यू असे दोन ODOP उत्पादने अधिसूचित केले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स