ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नागरी संरक्षण स्वयंसेवकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन.

नागरी संरक्षण स्वयंसेवकासाठी नोंदणी करण्याचे आवाहन.

प्रकाशन: 12 Jun 2025 07:27 PM
वाचन संख्या 159

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व तालुक्यामध्ये रिक्त असलेली मानसेवी सदस्य पदांची भरती करण्यासाठी स्वयंसवेक नोंदणी कार्यक्रम १३ ते १८ जून रोजी सकाळी १० वाजता उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी तसेच जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्गनगरी (ओरोस) सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पुरुष, महिला प्रवर्गांनी नवीन सदस्य नोंदणीसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले यांनी केले आहे.

स्वंयसेवक नोंदणी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे :- भारतीय नागरिक असावा, वयाची किमान १८ वर्ष पूर्ण झालेली असावीत, किमान चौथी पास असावा, शारिरिक दृष्ट्या सुदृढ असावा व कोणताही गुन्हा दाखल नसावा.
लागणारे कागदपत्रे:- शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक-( बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड, पहिले पान), वैद्यकीय प्रमाणपत्र व सध्याचे ४ फोटो.
निवड होऊन पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असल्यास कार्यालयाचे अथवा मालकाचे ना- हरकत प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्र धारक व इतर अन्य तपशिलाच्या पृष्टयर्थ सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवारास नोंदणीच्या वेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल तसेच नोंदणीच्या वेळी कोणत्याही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362-299252 वर संपर्क करावा.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स