आचरा हिर्लेवाडी येथे गुरुद्वादशीच्या रात्री रंगणार डबलबारी ..!
चिंदर | विवेक परब : दिनांक २ नोव्हेंबर गुरुद्वादशी दिवशी आचरा हिर्लेवाडी श्री अवधुत हळदणकर यांच्या श्री दत्तस्थानी आमने सामने डबलबारी भजन सामना रात्री १० वाजता होणार आहे. बुवा संदीप लोके (लिंगडाळ /देवगड) विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट ( सांताक्रुझ, मुंबई ) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. लोके यांना पखवाज योगेश सामंत, तबला- संदेश पुजारे तर शिरसाट यांना पखवाज अमोल पांचाळ, तबलासाथ अक्षय राणे करणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)