आठवडा बाजारात १५ किलो प्लास्टीक जप्त.
मालवण नगरपरिषदेची एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम.
मालवण | प्रतिनिधी : ‘माझी वसुंधरा 5. 0’ व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ तसेच पर्यावरण दिन ५ जूनच्या अनुषंगाने प्लास्टिक मुक्त मालवण अभियानांतर्गत मालवण शहरात प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखालील, सोमवार दि.२ जून २०२५ रोजीच्या आठवडा बाजारात १५ किलो प्लास्टीक जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात आली.
एकल वापर प्लास्टिक बंदी अंमलबजावणी ही मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमे अंतर्गत व्यावसायिक, दुकानदार यांच्याकडून जे बंदी करण्यात आलेलं प्लास्टिक पिशव्या इत्यादी वस्तू जप्त करण्यात आल्या. या कार्यवाही मध्ये सुमारे १५ किलो प्लास्टिक मालवण नगरपरिषद ने विविध विक्रेत्यांकडून जप्त व दंड केला असून, तसेच यापुढे एकल वापर प्लास्टिक वापर न करण्याबाबत मार्गदर्शन करून सुचना देण्यात आल्या आणि ही मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे अशी माहिती मिळत आहे.
ह्या मोहिमेत कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, शहर समन्वयक अनिकेत चव्हाण, खेमराज सावंत, शिपाई वळंजू यांनी उपस्थित राहून सदरच्या मोहिमेत अंमलबजावणी केली अशी माहिती नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)