ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण बेळणे मार्गावरील विरण येथे पुलाची संरक्षक भिंत कोसळली.

मालवण बेळणे मार्गावरील विरण येथे पुलाची संरक्षक भिंत कोसळली.

प्रकाशन: 29 May 2025 04:09 PM
वाचन संख्या 127

ब्यूरो न्यूज : विरण बाजारपेठेतील पोईपला जोडणारा मालवण बेळणे मुख्य रस्त्यावरील पुलाचा भराव सध्याच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा प्रकार सकाळी अकरा वाजता घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची रहदारी अशीच सुरू राहिल्यास संध्याकाळ पर्यंत संपूर्ण रस्ता वाहतुकीस बंद होणार असल्याचे माजी जि. प. बांधकाम सभापती श्री. अनिल कांदळकर यांनी स्पष्ट केले.

मालवण बेळणे हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागमधे येतो. श्री. कांदळकर यांच्या म्हणण्यानुसार सदर पुलाचे काम करून पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा निकृष्ट दर्जाचा कामाचा हा ज्वलंत नमुना आज आम्हाला पाहावा लागतो हे आमचे दुर्दैव आहे. रस्ता बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे मालवण ते कणकवली असा हा रस्ता असल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. विरण बाजारपेठ ही फार जुनी बाजारपेठ असून या बाजारपेठेवर अवलंबून दशक्रोशीतील लोक आहेत आणि त्यामुळे डॉक्टर, रेशन, शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय जीवनावश्यक गोष्टींसाठी ये जा करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने व्यापाऱ्यांचे ग्राहकांचे ग्रामस्थांचे फार मोठे हाल होणार आहेत. दिवसाचा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तरी सा. बा. विभागाने तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करून तात्काळ पर्याय उपलब्ध करुन द्यावा व अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. श्री कांदळकर यांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंतीला आवश्यक असणारे फाउंडेशन नसल्याने सदरची संरक्षण भिंत पडली असल्याचे स्पष्ट होत आहे असेच काम होत असल्यास शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम , शिवसेना शाखाप्रमुख नारायण राणे, विलास पांजरी, रवी कुशे, संदिप कुशे, बांबू वाडकर, यश पांजरी , राजू तिरोडकर, अमित कुशे, पप्पू आंबेडकर , विरण पोलिस पाटील निनाद माडये, पोईप पोलिस पाटील अविनाश जाधव, बबलू वेंगुर्लेकर, प्रसाद जाधव, मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स