ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
खारेपाटण येथे तिरंगा रॅलीचे आयोजन २३ मे रोजी.

खारेपाटण येथे तिरंगा रॅलीचे आयोजन २३ मे रोजी.

प्रकाशन: 22 May 2025 04:20 PM
वाचन संख्या 37

कणकवली | ब्यूरो न्यूज : स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी लढणाऱ्या तसेच वीरगती प्राप्त करणाऱ्या, देशातील नागरिकांना शत्रूपासून सुरक्षा आणि अभय देऊन सुखाचे घास खाऊ देणाऱ्या त्रिदलातील सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शौर्यकर्तृत्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅलीचे खारेपाटण येथे आयोजन करण्यात आले आहे. दहशत वादाच्या विरोधात शौर्य व प्राणपणाने लढून आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खारेपाटण येथे २३ मे रोजी सकाळी १० वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली.

खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण एस टी बस स्थानकापर्यंत काढण्यात येणाऱ्या या तिरंगा रॅलीत शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यवसायिक, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, इत्यादीसह सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रमाकांत राऊत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स