ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कोमसाप सावंतवाडीकडून 'संत शिरोमणी' निबंध स्पर्धा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोमसाप सावंतवाडीकडून 'संत शिरोमणी' निबंध स्पर्धा.

कोमसाप सावंतवाडीकडून 'संत शिरोमणी' निबंध स्पर्धा.

 Article image

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५१ व्या जयंती निमित्ताने आयोजन.


सावंतवाडी | प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखेकडून मराठी भाषेचे आद्यप्रवर्तक आणि महान पुरस्कर्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (सप्तशतकोत्तर) ७५१ व्या जयंती निमित्ताने 'संत शिरोमणी' निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटासाठी ही स्पर्धा होणार असून सावंतवाडी तालुका मर्यादीत ही स्पर्धा असणार आहे अशी माहिती शाखा अध्यक्ष दीपक पटेकर यांनी दिली. गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून ही स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.


युवा पिढीला संत ज्ञानेश्वरांचे कार्य व विचार अवगत व्हावे, तरुणाईला लिहिण्यास प्रोत्साहित करून मराठी भाषा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीकडून या तालुकास्तरीय शालेय निबंध स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता ८ वी ते १० वी साठी ही स्पर्धा होणार असून निबंधाचे विषय १) ज्ञानेश्वरी : मराठी भाषेचे लेणे व २) संत ज्ञानेश्वरांचे जीवनकार्य आणि अगाध ज्ञान असे आहेत. स्पर्धा निःशुल्क स्वरूपाची असून याचा कालावधी दि. १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे. २५ सप्टेंबर पर्यंत स्पर्धकांनी आपला निबंध दीपक पटेकर (दीपी), द्वारा फ्रेशमार्ट सुपर मार्केट जि. प. शाळा नंबर ०२ जवळ, नरेंद्र डोंगर रोड, जुना बाजार, सावंतवाडी या पत्त्यावर जमा करायचा आहे. तर अधिक माहितीसाठी दीपक पटेकर 9421237568, विनायक गांवस 9075119473 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.


स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रूपये १ हजार, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ₹. ७००/-, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ₹.५००/-सन्मानपत्र, सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ प्रथम ₹.२००/- व उत्तेजनार्थ द्वितीय ₹ २००/- व सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे असून ही बक्षीसे ॲड. नकुल पार्सेकर, प्रा.सुभाष गोवेकर, विनायक गांवस यांनी पुरस्कृत केली आहेत.


स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे असून निबंध मराठी भाषेतच असावा, निबंधात मांडलेले विचार, योग्य परिचय (प्रस्तावना), मुख्य मुद्दा आणि शेवट (समारोप) अशी रचनाबद्ध मांडणी असणे आवश्यक. शब्दसंख्या किमान ३०० ते ५०० शब्द मर्यादित असावी. निबंध हस्तलिखित व कागदाच्या एकाच बाजूस लिहावा. ही स्पर्धा निःशुल्क असणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण कोमसाप सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय तुतारी कविसंमेलनात केलं जाणार आहे अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे ‌.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स