ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
पिंगुळी येथे १ जूनला चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा.

पिंगुळी येथे १ जूनला चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा.

प्रकाशन: 22 May 2025 04:16 PM
वाचन संख्या 83

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० ते दुपारी १ या वेळात होणार आहे.

चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा आणि संगीत यांचे अद्वितीय संमीलन असते. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना ही जुनी व लुप्त होत चाललेली लोककला प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे.

“चित्रकथी म्हणजे आमच्या परंपरेचा आत्मा आहे. ही कला लोकांनी अनुभवावी, शिकावी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावी, हेच आमचं ध्येय आहे,” असे चेतन परशुराम गंगावणे म्हणाले. ते कार्यशाळेचे समन्वयक असून पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या वारशाचे जतन करणाऱ्या कुटुंबातील सदस्य आहेत.

केवळ ₹१०० प्रवेश शुल्कात ही कार्यशाळा कोणालाही खुली असून, सर्व वयोगटातील जिज्ञासूंना सहभागी होता येईल.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : चेतन परशुराम गंगावणे – ९९८७६५३९०९

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स