सिंधुदुर्ग जिल्ह्यात संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त ८ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त ८ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम.
तालुकानिहाय कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर.
श्रावण | गणेश चव्हाण : महाराष्ट्र नाभिक महामंडळ सिंधुदुर्गच्या वतीने, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नाभिक समाजाचे आराध्य दैवत 'श्री संत शिरोमणी सेना महाराज' यांची पुण्यतिथी मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६ रोजी विविध सामाजीक व धार्मिक कार्यक्रमांनी, महाराष्ट्र नाभिक नेते विजय सि. चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगदीश सु. चव्हाण जिल्हा महिलाध्यक्षा सौ. विद्या गुरुनाथ चव्हाण व युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांच्यामार्गदर्शनाखाली साजरी करण्यात येत आहे.
मालवण तालुका नाभिक संघटनेच्या वतीने पुण्यतिथीचे आयोजन भैरवी मंदिर येथे करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पं. स. सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, महिला अध्यक्षा सौ. दिपा शिंदे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने सकाळी ९ वाजता संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती व तीर्थप्रसाद, ह.भ.प. धामापूरकर गुरुजी यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, स्नेहभोजन, दुपारी ३ वाजता बाळगोपाळ मंडळ आचरा यांचे भजन होणार असून, रात्री ८ वाजता विश्वकर्मी प्रासादिक भजन मंडळ राठीवडे यांचे भजन. असे आयोजीत करण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्याच्या वतीने सौ. उज्वला उमाजी चव्हाण, पावशी यांचे निवासस्थानी पुण्यतिथी निमित्त, सकाळी १० वा. श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती, तीर्थप्रसाद, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दुपारी स्नेहभोजन, नंतर ३ वा. हळदीकुंकु, हरिपाठ, भजने असे कार्यक्रम कुडाळ तालुकाध्यक्ष भिवा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष दाजी माने यांचे उपस्थितीत सर्व बांधवांच्या नियोजनाप्रमाणे संपन्न होणार.
सावंतवाडी येथे प्रतिवर्षा प्रमाणे सेना महाराज पुण्यतिथी गोविंद चित्रमंदीर हाॅलवर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष सदा पवार, माजी जिल्हाध्यक्ष राजन पवार, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल न्हावेलकर जेष्ठ कार्यकर्ते शांताराम वेतोरेकर, हनुमंत कारीवडेकर यांचे उपस्थितीत साजरी होणार. यावेळी सकाळी ९ वा. श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती - तीर्थप्रसाद, रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दुपारी स्नेहभोजन महिलांसाठी खेळ पैठणीचा व वारकरी भजन असे कार्यक्रम सादर होणार आहेत.
कणकवली येथे माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, अध्यक्ष रोषण चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सकाळच्या सत्रात श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, १० वाजता आरती व तीर्थप्रसाद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व स्नेहभोजन असे कार्यक्रम होणार.
देवगड तालुकाध्यक्ष प्रमोद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विवेक चव्हाण व सचिव संदेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली ८ सप्टें. रोजी तालुका विभागवार, संत सेना महाराज पुण्यतिथीचे नियोजन करण्यात आले आहे.
वैभववाडी तालुकाध्यक्ष विजयानंद कदम व जेष्ठ नाभिक कार्यकर्ते मोहन चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली सकाळी ११ वा. वैभववाडी शहरात पूजन आरती तीर्थप्रसाद व नाभिक बांधवांची संघटणात्मक विषयावर चर्चा असे कार्यक्रम होणार.
वेंगुर्ले तालुक्यात अध्यक्ष किरण पवार, जेष्ठ बांधव कैवल्य पवार, शंकर पवार जिल्हा महिला सदस्या व तालुकाध्यक्षा सौ. कार्तिकी किरण पवार, जयराम उर्फ विवेक आडारकर, प्रसाद तुळसकर यांचे उपस्थितीत ब्राम्हण मंदिर पवारवाडी वेंगुर्ले येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत सेना महाराज यांची पुण्यतिथी निमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पुजन तिर्थ प्रसाद व आरती असे कार्यकार्यक्रम होणार.
दोडामार्ग तालुकाध्यक्ष योगेश आयनोडकर यांचे मार्गदर्शनाखाली जेष्ठ नाभिक बांधव यांचे उपस्थितीत मंगळवार दि. ८ सप्टेंबर रोजी सेना महाराज पुण्यतिथी, सुदेश उगाडेकर यांच्या सलुनमध्ये साजरी होणार. सकाळी १० वा. पुजन आरती व तिर्थ प्रसाद. असे थोडक्यात कार्यक्रम येथे होणार आहेत.
सिंधुदुर्गात संत सेना पुण्यतिथी निमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रम या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील सर्व नाभिक बंधुभगिंनीनी व इतर नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सचिव जगदीश (टेलर) परशुराम चव्हाण यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)